आपला लेख आणि खास करुन शेवटच्या ओळी वाचुन भुतकाळात जाऊन आलो. खुप जवळच्या नात्यांमध्ये असणाऱ्या मीता आठवल्या. सगळ्या एकाच वयाच्या. शैक्षणिक जीवनात मी स्वतः प्रेम विवाहाची वकिली करायचो. पण ते अनेकदा अविचारी असत अस इतरांच्या अनुभवा वरुन कळुन आले.
समाजात अश्या अनेक मीता आहेत. त्याला खत पाणी समाजच घालत असतो. पण शेवटी हे निर्णय प्रत्येकाचे स्वतःचे असतात. मला सुद्धा एक मीता वाचवता आली असती हे आठवुन वाईट वाटल.