मैथिली,
हा अनुभव मला सुधा मुर्तींनी डॉलर बहु मध्ये लिहिलेल्या अनुभवां सारखा वाटतो. अमेरिकेत हे अनुभव येण मला एकदम धक्का नाही वाटत. चुक सगळ्यांचीच असते. कोणा एकाला दोष नाही देता येत. सहानुभुती स्त्रीला मिळते समाजाची. यात सुनीता बळी ठरली ह्याला जबाबदार ती सुद्धा नाही का? आठ दिवसात लग्न ठरण्यापासुन होण्या पर्यंत घाई हवी कशाला? गोष्टी लपवल्या हे चुक आहेच पण त्या मुद्दाम लपवल्या जातात हे न समजणारे मुर्ख नाहीत काय?
अमेरिकेत मुले घर सोडुन जातात लवकरच. जमल नाही तर घटस्फ़ोट घेतात. तिथला समाज हे सगळे मान्य करतो. ही अमेरिकेची विचारसरणी आहे.  सुनीता वा इतर कोणी हि ती हवी हवी करुन स्विकारल्यावर मग परतीच्या मार्गाचा विचार का?

अपयश आल्यावर भारत आठवतो आणि भारतात अपयशाला नको इतके तुच्छ लेखतात. ते चुक आहेच. पण त्या ठिकाणी जाउन इथल्या समाजाचा विचार करावा हे पुर्ण अयोग्य आहे. एकदा भारतीय भुमी सोडल्यावर भारतीय हवेत कशाला? एवढ्या हिरीरीने नवऱ्याच्या जीवावर अमेरिकेला जायचे स्वप्न बाळगणे हे आपल्या समाजातल्या एका किडीचे दर्शन आहे. एवढीच इच्छा असते तर स्वतः शिकुन स्वतःच्या कुवतीवर जावे. मग़ प्रवीण नाहीत मिळत. मग वेदा बनते.

आजच्या भारतात निदान शहरातल्या मुली तरी सुनीता नसतात अस मला वाटत. असे इतके अनुभव इतके आहेत कि ते आता कोणाला माहीत नसतील असे वाटत नाही.

अगदी याच धर्तीवर मधे एकदा एक मालिका होती. मला नाव नाही आठवत पण त्यात सुनीताचे काम कार्तिका राणे ने आणि वेदाचे काम जॉगिंग पार्क मधल्या अभिनेत्रीने (पेरिदाज असे काहि तरि तिचे नाव आहे) केले होते. आणि हि मालीका ३-४ वर्षांपुर्वी लागत होती. आपल्या इथे अश्या मालिका पहाणारे जरा कमीच.

प्रवीण सारखे पहिल्यांदा पुळचट आणि नंतर धुर्त आणि अमेरिकेचा चष्मा घालुन फ़क्त तो एकच क्षण पाहणाऱ्या सुनीता भारतात गल्लो गल्ली आहेत.