नांगराने घात केला, नाव घेई हेलकावे
देहवीणेला गवसणी घालणारा शिशिर येता
चेहऱ्यावर चोपडावे का वसंताचे गिलावे
कोसते इंद्रायणीला कोरडी गाथा तुक्याची
का कपाटे भूषवाया मी तुझ्या पृष्ठी तरावे
लाजण्याचा उंच किल्ला, रोजची माझी चढाई
संयमाचे बुरुज आता एकदाचे शरण यावे

सुरेख गझल आहे. वेगळ्याच प्रतिमा वापरल्यात.                                                       

    साती.