> आपण कथा ज्या रितीने लिहिली त्यावरुन तरी सुनिताला अमेरिकेची ओढ होती असे वाटत नाही तिला हवा होता "तिचा सखा"
तिला आणि तिच्या कुटुंबियांना अमेरिकेची ओढ होतीच आणि खेदानं सांगावंसं वाटतं की अजूनही आहे. पण कोणत्याही सामान्य मुलीप्रमाणे तिला तिचा सखा सुद्धा हवा होताच. आता हा सखा अमेरिकेचा असेल तर आणखी काय हवं? अर्थात आठ दिवसात लग्न झाल्यामुळं तिच्याही मनात धाकधुक होतीच इथे येताना.
तुमच्या ह्या प्रश्नामुळे एक प्रसंग आठवला. ह्या कथेत जरी उल्लेख केला नसला तरी सुनिताला धाकटा भाऊही आहे. प्रवीण पहिल्यांदा सुनिताला बघायला गेला तेव्हा तो १२वीला वगैरे असेल. त्यावेळी सुनिताच्या भावानं प्रवीणला लगेच आपली पसंती देऊन टाकली. कारण ऐकाल तर कीव कराल त्याची. कारण प्रवीणनं पोलोचा शर्ट आणि ऍदिदासचे बूट घातले होते. आता कपडे व्यक्तिमत्व खुलवतात हे मान्य, पण फक्त कपड्यांवरुन तुम्ही कुणाबद्दल आपलं मत कसं बनवू शकता?