श्लेष म्हणजे एकापेक्षा जास्त गोष्टी एका जागी येऊन एकत्र बांधल्या जाणे.

उदा. दोन निरनिराळे अर्थ एका शब्दात येतात तेव्हा त्याला श्लेष (पन्) म्हणतात. तेव्हा हे दोन अर्थ ह्या शब्दात श्लिष्ट आहेत असे म्हणता येईल.
संश्लेषण म्हणजे अनेक गोष्टी एकत्र आणण्याची क्रिया (सिंथेसिस) उदा. प्रकाशसंश्लेषण येते प्रकाश, कार्बनडायऑक्साईड आणि सूर्यप्रकाश एकत्र आलेलेआहेत.
विश्लेषण म्हणजे एकाजागी असलेल्या गोष्टी वेगवेगळ्या करणे (अनॅलिसिस)
आता आश्लेषा ह्या शब्दाची व्युत्पत्ती कोणी सांगू शकेल काय?