हिंज = बिजागर

ऍन्कर = नांगर ( अभियांत्रिकीसाठी 'अडकवणी' असा शब्द तयार करून वापरात आणावा लागेल )

ट्रस = (तुळयांची जुळणी, बांधणी सांधणी ... असे काहीसे म्हणावे लागेल  तुळयांची सांधण हे बरे वाटते.)

रिजिड फ्रेम = पक्की चौकट, ( निष्ठुर चौकट हे जास्त नेमके होईल )

रेझिस्टन्स = अवरोध

बेंडींग फोर्सेस = वाकवणाऱ्या प्रेरणा, वाकवणारी बले

फॅब्रिकेट = घडवणे, जुळवणे, रचणे ( प्रीफॅब्रिकेटेड बिल्डिंग ब्लॉक्स साठी शिर्क्यांनी 'पूर्वरचित वास्तुघटक' असा अत्यंत नेमका शब्द प्रचारात आणल्याचे तुम्हाला ज्ञात असेलच. )

एखाद्या वाचनालयात मिळाल्यास शिर्क्यांच्या (शिर्के-सिपोरेक्स?) जुन्या वर्तमानपत्रातल्या जाहिराती नजरेखालून घातल्यात तर नागरी अभियांत्रिकीशी संबंधित अनेकानेक सुंदर आणि नेमके प्रतिशब्द तुम्हाला मिळतील असे वाटते.