२. आपला मुलगा म्हणजे सद्गुणांची खाण आणि येणारी सून वाईट असा दृष्टीकोन सार्वत्रिक दिसतो जो माझ्या मते अयोग्य आहे.मग मुलगा - सून घरात रहात असोत किंवा परदेशात.पण या कथेतील परिस्थिती पाहून खूपच वाईट वाटले.
हे अतिशय गैरजबाबदार विधान आहे. प्रत्येकाने आपल्या आई वडिलांना या जागी उभे करुन हे विधान लागू होते का ते पहावे. मला या विधानाचा निषेध करावासा वाटतो.
३ ऱ्या मुद्द्यावर टग्या दादांशी पूर्ण सहमती.
त्यांना डिपेन्डन्ट व्हिसावर अमेरिकेत राहण्यास तयार होणारी गृहकृत्यदक्ष सोफिस्टिकेटेड मोलकरीण हवी असते असे काहीसे जहाल मत माझे अलिकडे होऊ पहाते आहे हे स्त्रीवादीपणाच्या संभाव्य आरोपांना ध्यानात घेऊनही इथे सांगावेसे वाटते.
जे पैसा कमवायला अमेरिकेत येतात त्यांना आपली बायको नोकरी करावी असेच वाटते. पण डिपेन्डन्ट व्हिसा मुळे ते शक्य नसते. असो.
स्वतःच्या हक्काच्या घरात स्वतःसाठी आणि आपल्याच नवऱ्यासाठी काम करण्याने आपण सोफिस्टिकेटेड मोलकरीण होतो अशी भावना असणाऱ्यांनी लग्न करण्याच्या भानगडीत पडू नये.