आपल्या आक्षेपाला माझीही सहमती आहे. सगळ्या मुली अमेरिकेच्या ध्यासाने इथे येतात किंवा सगळी अनिवासी भारतीय मुलं बायकोकडे मोलकरीण म्हणून बघतात हे निव्वळ चुकीचे विधान आहे. मी इथे फक्त एका व्यक्तीला आलेल्या अनुभवांबद्दल लिहिले आहे. सरसकट विधान केलेले नाही, करणारही नाही. कुणाचा असा गैरसमज झाला असल्यास माझ्या मर्यादित लेखनकौशल्याचाच तो परिणाम आहे. असो.

टग्या, तुम्ही म्हणता त्याप्रमाणे विषय उगाळण्यात काहीच अर्थ नाही हे मात्र पटले नाही. हे असे प्रसंग आजही घडतात हे मुलींच्या पालकांना समजणे गरजेचे आहे. त्यातूनच तर समाजात जागरुकता येईल. केवळ ह्या आणि ह्याच उद्देशाने मी हा लेख लिहिला आहे. शिवाय सुनिता हा लेख आणि चर्चा वाचू शकत नाही म्हणूनच मी हे धाडस केले आहे. ती दुखावली जाईल असं काहीही मी करणार नाही ह्याची खात्री बाळगा.

तुम्ही म्हणता त्याप्रमाणे अल्पकाळाची सुट्टी हे "आठवड्यात लग्न" करण्यामागचे कारण नक्कीच आहे, पण आयुष्यभरासाठी आपण ज्याचा हात हातात घेतोय त्याला समजून घेणे हे नक्कीच जास्त महत्त्वाचे आहे. तेव्हा निवासी भारतीय मुलींशी लग्न ठरवण्यापूर्वी त्यांच्याशी इंटरनेटवर, फोनवर गप्पा मारणे हे तरी मुलांना नक्कीच करता येईल. मी तर म्हणेन एका सुट्टीच्या दरम्यान अशा गप्पातून ओळख झालेल्या मुलीला भेटून, विचार जुळत असल्यास तिच्याशी साखरपुडा करावा आणि पुढच्या सुट्टीत लग्न करावे. आता बऱ्याच लोकांना हे जमेलच असे नाही, पण प्रयत्न तरी नक्कीच करावा.

बाकी तुम्ही खूपच छान मुद्देसूद प्रतिसाद लिहिला आहे. आवडला.

मैथिली