दुर्दैवाची आणि शरमेची गोष्ट आहे, पण अशा गोष्टींची (विशेषतः अशा सार्वजनिक, इंटरऍक्टिव्ह फ़ोरम्सवर*) प्रसिद्धी आणि त्यानंतर घडणारी त्यावरची चर्चा यांतून एक चर्वितचर्वण यापलीकडे काहीही साध्य होत नाही, जे सदर 'व्हिक्टिम'ला इच्छित/अपेक्षित/आवडण्यासारखे/न्याय्य असेलच, असे नाही, असे मला तरी प्रामाणिकपणे वाटते.
समाजात ज्या गोष्टी होतात त्यावर प्रकाश टाकणे शरमेची बाब का असावी? या व्यक्ती समाजाचे अंग आहेत आणि असे प्रकार पुढे आणण्यास आणि त्यामुळे कुणी सावरु शकत असेल तर त्यात वावगे काय?
वरिल चर्वित चर्वणावरुनच लोकांच्या मनाचा वेध येतो. त्यांचे गैरसमज कळून येतात आणि ते जर दूर होऊ शकले तर काय वाईट? मला वाटत आपला तसाच प्रयत्न आहे.
अधिक विचार करता, त्या व्यक्तीच्या जागी मी जर असतो, तर माझी धारणा 'Leave me alone to get along with my life, damn it - Help me if you can, but please don't discuss my woes publicly!' (इंग्रजीबद्दल [आणि अपशब्दांबद्दल] क्षमस्व!) अशीच राहिली असती, याची खात्री वाटते.
शक्य आहे आणि नाही ही. अशा व्यक्ती बरेचदा स्वतःच पुढे येऊन आपला अनुभव मांडतात. त्यावरुन इतरांनी शहाणे व्हावे आणि अन्यायाला वाचा फोडणे हा उद्देश असतो (तो सफल होतो का ही बाब वेगळी)
सामाजिक कथा या समाजावर आधारित असतात आणि त्या येन केन प्रकारे सत्यकथाच असतात.