प्रियाली

'भूर्जापत्र' माझ्या माहितीप्रमाणे कोणत्याही झाडाच्या खोडाच्या सालीपासून बनवलेल्या कागदाला म्हटलं जातं.  पण पपायरस हा कागद झाडाच्या खोडाच्या सालीपासून बनवलेला नसतो तर खोडाची साल काढून टाकून आतल्या गराचा लगदा बनवून त्यापासून केलेला असतो.  त्यामुळे याला भूर्जापत्र म्हणता येणार नाही असं वाटतं.  दुसरी गोष्ट पपायरस कागद cyperus papyrus या पाम सारख्या दिसणाऱ्या ईजिप्त मधल्या एका विशिष्ट झाडापासूनच (झुडूपापासूनच) बनवला जातो.  म्हणजे त्याचं नाव हे त्या झाडाशी निगडीत आहे.  त्यामुळे याला भूर्जापत्र किंवा असं कुठचंही सर्वसाधारण नाव देता येणार नाही त्याला पपायरस किंवा पपायरसचा कागद असंच म्हणावं लागेल.  माझी माहिती कदाचित चुकीचीही असू शकेल कारण कधीतरी ईजिप्तला गेलेलं असताना  ऐकलेल्या माहितीवरनं हे सगळं लिहिलं आहे. त्यामुळे इतर कोणाला जास्त माहिती असल्यास समजून घ्यायला आवडेल.     

- मिलिंद