मी नीरजा पटवर्धन. बऱ्याचश्या मराठी साईटस् वर अज्जुका या नावाने लिहिते वावरते. 

व्यवसायाने वेशसंकल्पक (कॉश्च्युम डिझायनर... फॅशन नव्हे) माझं आजपर्यंतचं मोठं काम म्हणजे 'श्वास'. वेशसंकल्पनाबरोबरच मुंबई व पुणे विद्यापीठात हाच विषय नाट्यविभागाच्या विद्यार्थ्यांना शिकवते. व्हिजिटिंग फॅकल्टी आहे.  पण याचबरोबर थिएटर ही माझी गरज आहे आणि त्यामुळेच माझी महत्वाची ओळखही.  थोडेफार लेखन, दिग्दर्शन इत्यादी अधूनमधून मी करत असते. कोणे एके काळी अभिनयही करायचे पण तोच व्यवसाय होईल अशी चिन्हे दिसायला लागली आणि अभिनयाचा कंटाळा आला.

मनोगतावरील लोकांना माझे इथले येणे फारसे आवडत नाही ही एक जाताजाताच पण महत्वाची अशी माझी ओळख.

नीरजा