अदिती उर्फ लंपन ह्यांनी पाठविलेले स्पष्टीकरण मी स्वीकारलेले आहे.
त्यांचे उत्तर बरोबर आहे.
ह्या कोड्याबाबत मनोगतींमध्ये कमालीची उत्सुकता दिसून आली. कारण फारच सोपे वाटणरे कोडे, खरीखुरी गणितीय समस्या होती, आणि तिला सोडविण्यासाठी लांबलचक स्पष्टीकरणाचीही गरज होती. शिवाय लिहिलेले उत्तर तपासणेही अवघड असल्यामुळे समजण्यात गल्लत होऊन उत्तर चुकीचे ठरण्याचे प्रकारही घडले. असे होऊनही अशा मनोगतींनी संयमितपणे आपापल्या उत्तरांची समर्थपणे पाठराखण केली. त्या सर्वांचे मनःपूर्वक आभार!
वेदश्री, तुझे १३ चेंडूंचे कोडे मनोगतावर कुठे आहे त्याचा संदर्भ खरे तर तू द्यायला हवा होता. पण ह्या कोड्याच्या उत्तराचाही प्रयत्न तू केलेला दिसत नाहीस. असो.
एकलव्यही, अनेक उत्तरे (कंटाळवाणी आणि चतुर) देणार होते. त्यांनी एक उत्तर मात्र दिलेले आहे.
सोज्वळ, समई, विचक्षण, मनिश_पुरेकर, महेश हतोळकर, प्रियाली यांचे प्रयत्न असफल झाले तर एकलव्य, मिलिन्द२००६, कुशाग्र आणि अदिती उर्फ लंपन ह्यांचे सफल ठरले. सर्व स्पर्धकांचे मनःपूर्वक आभार. आता माझेही उत्तर तपासण्यासाठी खुले करत आहे. त्याचा पंचनामा तिथेच घालावा ही विनंती!