विसोबा,
धन्यवाद.
दुरापास्त झाली - नजरभेटसुद्धा!
असा बसवला आसवांनी पहारा...
हे तेवढे समजले नाही. आपल्याच शब्दात समजावून घ्यायला आवडेल. कृपया आपल्याला अभिप्रेत असलेला अर्थ उलगडून सांगाल का?

डोळ्यांवर अश्रूंचा पडदा असा तयार होतो की पलीकडचं दिसणं अशक्य होतं. अर्थात पलीकडच्या माणसाशी नजरभेट होणंही! 
कधी कधी आपण स्वतःलाच दुःखात / वेदनेत एवढं गुरफटून टाकतो की, पलीकडचं सुंदर जग दिसेनासं होतं. यालाच मी 'आसवांनी बसवलेला पहारा' असं म्हटलंय.

हाच शेर मी आधी असा लिहिला होता-

तुझी बोलकी नजरही कैद झाली
असा बसवला आसवांनी पहारा

- कुमार