मन्दार साहेब,

तुम्ही काढलेला विषय अतिशय उत्तम आहे. मी सुद्धा तो कार्यक्रम पाहिला. प्रथमदर्शनी माझाही विश्वास बसला नाही. मी त्या घटनेकडे 'एक खगोलीय घटना' म्हणून पाहिले. पण जे काही अन्दाज सान्गितले गेले ते मात्र अगदी बरोबर आले आहेत. याकडे फ़क्त योगायोग म्हणून दुर्लक्ष करणे योग्य नाही. या विषयावर अनेक ग्रन्थ उपलब्ध आहेत, उदा. सहदेव भाडळी. या ग्रन्थान्कडे 'पुराणातील वान्गी पुराणात' या द्रुष्टीने न पाहता एक सन्दर्भ ग्रंथ म्हणून पाहणे उचित ठरेल. सर्व मनोगतींनी या विषयावर आपली मते व्यक्त करावीत ही विनंती.