शिवश्री,
गझल आवडली. काफ़िया आणि रदीफ़ दोन्ही सुंदर आहेत.
मतला आवडला.
'गाईगाई' हा शब्द लिहिताना वृत्त-नियमाप्रमाणे 'गाइगाई' असा लिहावा, ही नम्र विनंती. हा शेर आणि 'आई'चा शेर निरागस वाटले... आवडले.
'शेर ना माझी रुबाई चालली' - वा!
(नारायण सुर्व्यांची
'कवितेऐवजी रद्दी विकली असती तर बरे झाले असते,
निदान देणेकऱ्यांचे तगादे तरी चुकवता आले असते'
ही कविता आठवली.)
मक्ताही आवडला. तुमची शाई वाया गेलेली नाही. (ह. घ्या.)
- कुमार