एखाद्याचा समावेश दुसरा कोणीतरी करीत असतो.
प्रवेश आपला आपण करीत असतो.
हे लक्षात घेऊन अमक्या गोष्टीला 'समाविष्ट केले' किंवा तमकी गोष्ट 'प्रविष्ट झाली' असा भेद करता येईल, असे वाटते.
शिवाय समावेश हा स्थिती दर्शवतो समावेशाची स्थिती तुलनेने दीर्घकाळ राहते; पण प्रवेश हा स्थित्यंतर दर्शवतो, आणि प्रवेश ही क्रिया क्षणिक असते, 'प्रवेश' झाला रे झाला की स्थित्यंतर संपून 'अंतर्भाव' ही दीर्घकालीन स्थिती सुरू होते असे वाटते.
चू.भू.द्या.घ्या.