प्रमोदपंत,
शुद्ध लिहिण्याचा आग्रह पटला. मला वाटतं निदान साध्या साध्या चुका तरी लोकांनी टाळाव्यात. (त्यांत मीही असेन कदाचित; पण मी टाळायचा प्रयत्न करतो).
कित्येकदा 'तु' / 'तीला' असं लिखाणही दिसतं.
मला माहिती असलेले काही नियमः
(१) ही शब्दांना प्रत्यय लावले की त्यांतले ऱ्हस्व-दीर्घ बदलतात... उदा.
ती / तिला
वडील / वडिलांना, गरीब / गरिबांचे
(२) मराठीत संस्कृतमधून आलेले ऱ्हस्व उकारान्त वा इकारान्त शब्द दीर्घ उकारान्त वा इकारान्त होतात. उदा.
कवि (संस्कृत) - कवी (मराठी)
रवि (संस्कृत) - रवी (मराठी)
चक्रपाणि या शब्दाचं पण तसंच व्हायला हवं. (आपले मनोगती चक्रपाणि हे त्यांचं नाव ऱ्हस्व इकारान्त लिहितात आणि ते नाव विशेषनाव असल्यामुळे मी त्यांच्याशी लिहिताना तसंच लिहितो.)
(३) काही अवघड शब्द-
'पारंपरिक' - परंपरामुळे  ---- 'पारंपारिक' हा चुकीचा उच्चार आहे.
'नैरृत्य' - इथे बहुतेक लोक रफार विसरतात.

विसोबा,
तुमचं मत नाही पटलं. हे म्हणजे एखाद्या रागात चुकून दुसरा सूर लागला (मुद्दाम नव्हे) तर गुण कापा आणि बाकी बंदिश किती छान आहे ते बघा असं म्हणण्यासारखं वाटतं. (भीमपलासमधे शुद्ध निषाद लावून गुण मिळवणारे एकटे बालगंधर्वच होते!)

- कुमार