आहे.

ऱ्हस्वांत तत्सम शब्दांचे मराठीकरण, हे 'चक्रपाणि', 'वज्रपाणि', 'शारंगपाणि' यांसारख्या शब्दांच्या मराठीत चुकीचे लिहिले ज़ाण्यास कारणीभूत असावे. असे शब्द मराठीत लिहिताना शेवटचे अक्षर दीर्घ लिहिल्यास चालते असा 'नियम' (?) ऐकिवात आहे. त्यानुसारच हे होत असावे. मात्र यामुळे होणारा अर्थबदल डोळ्यांआड करून चालणार नाही, हे येथे ध्यानात घेतले पाहिज़े, असे प्रामाणिकपणे वाटते. अशा अयोग्य दीर्घिकरणामुळे हे शब्द तद्भव असल्याचा चुकीचा निष्कर्षही काढला ज़ाऊ शकतो, हे टाळले गेले पाहिज़े.