प्राचार्यांच्या वक्तृत्वाबद्दल फार बोलले जाते. कुणाच्या श्रद्धेला वगैरे धक्का पोचत असेल तर माफ करा, पण मला त्यांचे बोलणे कृत्रीम आणि शब्दबंबाळ वाटते. कोट्या करण्याच्या अतिरेकी मोहापायी ते जेंव्हा अर्थाशीच तडजोड करतात( व.पुं. प्रमाणे) , तेंव्हा ' हे करणे खरोखर गरजेचे होते काय?' असा प्रश्न पडतो. एक विद्वान म्हणून त्यांच्या प्रतिमेला अशाने गालबोट लागते. हे गालबोट की मूळ सौंदर्य अधिक खुलवणारी तीट, हे ज्याने त्याने ठरवावे.