चक्रपाणि ह्या संस्कृत शब्दाचे मराठीत चक्रपाणी व्हायला हवे हे पटत नाही.
पण काय करणार:) नियम शेवटी नियम आहेत.  नव्या नियमांनुसार रवी, चक्रपाणी, शारंगपाणी योग्य आहेत. मग ताक घुसळणाऱ्या रवीचे आणि दिनमणी रवीचे काय करावे?

ऱ्हस्वान्त तत्सम शब्दांनी मराठीत दीर्घान्त करावे, हा नियम खरे तर वादग्रस्त नाही. कारण मराठीत आपण अश्या ऱ्हस्वान्त शब्दांचे  ऱ्हस्व उच्चार करत नाही.

पण खचित, विपरित ह्या सारख्या शब्दांना नव्याने होऊ घातलेल्या नव्या नियमांनुसार खचीत, विपरीत असेच का लिहिले जातात ते कळत नाही?
तसेच  अंतरिक्ष ह्या शब्दाचे मात्र कोडे आहे. संस्कृतमध्ये अंतरीक्ष असा असला तरी ह्याच मराठीत अंतरिक्ष असा का लिहिला जावा हे कळत नाही. तीच गोष्टी प्रतीती, प्रचीतीची. असो.  तज्ज्ञांतही ह्या नियमांवरून मतभेद आहेत. सगळ्यांनाच हे नियम मान्य नाहीत.


चित्तरंजन