शुद्ध भाषेचा आग्रह "बोली"भाषा नष्ट करणारा ठरणारा ठरेल.
अगदी पटण्यासारखे आहे. पण कार्यालयीन कामकाज, संदर्भग्रंथ,पाठ्यपुस्तके आदींसाठी हा आग्रह हवा.
श्री. म. माट्यांनी एका लेखात हीच भीती अनेक दशकांपूर्वी व्यक्त केली होती. त्या लेखात त्यांनी एक हकीगत सांगितली आहे. त्यांना एकदा एका खेड्यातून एक पाटील कुठल्याश्या कार्यक्रमाला निमंत्रण देण्यासाठी येतात. तेव्हा पाटील आपली ग्रामीण बोलीभाषा विसरतात आणि माट्यांसमोर शहरी प्रमाण भाषेत बोलण्याचा प्रयत्न करतात. तेव्हा माट्यांना थोडे हसू येते आणि पण बरेचसे वाईट वाटते. आपली बोलीभाषा एवढ्या जोमदार सकस असताना प्रमाण भाषेचा अट्टाहास नको, असे माट्यांचे म्हणणे होते.