तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री संपादक असताना प्रकाशित झालेल्या मराठी विश्वकोशाच्या खंडात स्थापत्य अभियांत्रिकीविषयी एक प्रकरण आहे त्यात बहुतेक प्रतिशब्द मिळतील असे वाटते. माझ्या आठवणीप्रमाने त्यात बेंडिंग मोमेंट ला "परिबल" व शीअर फ़ोर्सला "कैचीबल" असे शब्द दिलेले आहेत.

त्याची प्रत सध्या माझ्याकडे उपलब्ध नाही पण पुण्यातील किंवा अन्य (महाविद्यालयीन सुद्धा) ग्रंथालयांत मिळू शकेल असे वाटते. तो कोश मी स्वतः मएसो (गरवारे) च्या ग्रंथालयात पाहिलेला आहे.

एखाद्या मनोगतीला मिळाला तर त्यात अनेक तांत्रिक प्रतिशब्द मिळतील.