कुल्फीताई,
"यदा यदा हि धर्मस्य" या भगवंताच्या वचनाप्रमाणे मनोगतावरील धर्माला (इथे
धर्म हा शब्द रिलिजन या अर्थी घेऊ नये) ग्लानी येताच तुम्ही
सद्रक्षणाय आणि खलनिग्रहणाय अवतरता हे आमच्या ध्यानात आले आहे :)
तुमची रचना छान आहे. "हलकेच घ्या", "भाषांतरे" आणि "कोडी-उखाणे" विशेष आवडले.
"'संमेलनात' आता आडून वार होणे" इथे "होणे" वर थांबल्याने
व्याकरणदृष्ट्या काहीतरी राहिल्यासारखे वाटते. "वार होणे बरे नव्हे" किंवा
"वार होणे आता सवयीचे झाले आहे" असे काहीतरी पुढे असावे असे वाटू शकते.