ऋतुगंध म्हणतात त्याप्रमाणे इथे वर्णिलेली परिस्थिती कुणावर आली असेल? बहुसंख्य वाचकांना असा अनुभव नसल्याने केवळ कल्पनाविलासावर भागवावे लागेल असे वाटते. वास्तवापासून दूर असणाऱ्या कल्पनांमुळे एकूण रचनेचा प्रभाव कमी होतो असे वाटते.

असहमत आहे.

विरहाची वर्षे सरली , ते मीलन दूर न आता

मृत्यूला खात्री आहे , मजलाही संशय नाही

हा शेर सोडल्यास मला सगळेच शेर आपलेसे वाटले. मी आध्यात्मिक-बिध्यात्मिक माणूस नाही आणि मला मरणाची सध्यातरी खात्री नाही. म्हणूनही असावे. पण इतर शेर मला नक्कीच जवळेच वाटले.