शुद्धलेखनाचा आग्रह धरणे बरोबर आहे. पण त्याचबरोबर भाषा ही प्रवाही आहे हे ही विसरता कामा नये. १०० वर्षांपूर्वीची मराठी आणि आजची मराठी यात निश्चितच फरक आहे. तसेच बोली भाषा हा एक स्वतंत्र प्रकार आहे. बोली भाषा म्हणजे चुकीची भाषा
या मताशी मी सहमत नाही. (पंकज यांच्याशी सहमत.) उदाहरण द्यायचे झाले तर मूळ ब्रिटिश इंग्रजी आणि स्कॉटलंडमधे बोलले जाणारे इंग्रजी यात बराच फरक आहे. मग स्कॉटिश इंग्रजी अशुद्ध असा अर्थ घ्यायचा का?
हॅम्लेट