समाविष्ट हा स्थितीदर्शक तर  प्रविष्ट हा कृतीदर्शक आहे.

उदा. श्रीखंड खाद्यपदार्थांच्या गटात समाविष्ट आहे तर विचक्षण मनोगतावर प्रविष्ट झाले.

क्वचित समाविष्ट हा शब्द द्वितीयपुरूषी कृतीसाठीही वापरला जातो.

उदा. सरकारने क्ष जात ही मागासवर्गीयांच्या यादीतून काढून इतर मागासवर्गीयांच्या गटात समाविष्ट केली आहे.

परंतु समाविष्ट शब्दाचा प्रथमपुरूषी कृतीवाचक उल्लेख माझ्या पाहण्यात नाही.