आपले करावे तेवढे कौतुक कमीच आहे. आपल्याकडे ज्ञान अश्या प्रकरे समजवुन देणारे लोक हवेत आणि मनोगत सारखे माध्यम हवे. सर्वसामान्य लोक गणित आणि विज्ञान याचा चुकिच्या प्रकरे केलेल्या शिकवणीमुळे बाऊ करतात आणि शिकत नाहीत अन आपत्तीच्या वेळी हाय खाउन खचतात. जर अशी माहिती मराठीत आणि सचित्र असेल तर खुप शंकाचे निरसन होईल.

मी जर्मनीमध्ये कलोन येथे पाहिलेला पुल कदचित कँटिलीव्हर प्रकारचा आहे. तो सुद्धा स्थापत्य शास्त्राचा एक चांगला नमुना आहे.

पुल या संदर्भात काही इतर माहिती आपण एक मेकांना सांगु शकलो तर छानच.

  1. भारतातले बरेच पुल इंग्रजानी बांधले आहेत का?
  2. पुलावरुन पायदळाने कवायत करु नये म्हणतात ते खरे आहे का? कदाचित त्यामागे कंपन शास्त्राचा काही अभ्यास आहे.
  3. कोकण रेल्वे लोहमार्गावर उंच ठिकाणी बांधलेले पुल कोणत्या प्रकारचे आहेत?

चाणक्य