हिंज = बिजागर
'हिंज'साठी 'बिजागर' हा शब्द मराठीत प्रचलित असला, तरी तो मूळचा मराठी नसावा, आणि (पाव, बटाटा, साबण, नाताळ, अननस यांसारख्या अनेक शब्दांप्रमाणे) बहुधा पोर्तुगीज भाषेतून मराठीत आला असावा, असे वाटते.
पोर्तुगीज भाषेत 'हिंज'ला 'बिजागर'च्या जवळपास जाणारा शब्द कोणता याची कल्पना नाही, परंतु स्पॅनिशमध्ये 'हिंज'साठी 'बिसाग्रा' (bisagra) असा शब्द असल्याचे अधिकृत सूत्रांकडून कळते (बॅबेलफ़िश ट्रान्स्लेशन). अर्थात स्पॅनिश आणि मराठी भाषांत थेट संपर्क कधीही नव्हता, परंतु स्पॅनिश आणि पोर्तुगीज या अत्यंत जवळच्या भाषा असून, पोर्तुगीज आणि मराठी भाषांत पोर्तुगीज शब्दांची मराठीत आयात होण्याइतका प्रबळ थेट संबंध निश्चितच होता. त्यामुळे 'हिंज'साठी 'बिसाग्रा'च्या जवळपासचा एखादा पोर्तुगीज शब्द असणे आणि तो 'बिजागर' बनून मराठीत येणे अगदीच अशक्य नाही.
अर्थात खात्रीलायक माहितीच्या अभावे हा निव्वळ अदमास आहे. केवळ 'बिजागर' हा तथाकथित 'मराठी' पर्याय मराठी नसून असाच आणखी एखादा परभाषीय शब्द असणे अशक्य नाही, एवढेच सुचवावेसे वाटते.
- टग्या.