नंदन,नरेंद्र,महेश प्रतिशब्द सुचवल्या बद्दल आपले आभार. माझ्याही मनात लालूच हा शब्द आला होत पण विचक्षण यांच्या म्हणण्याप्रमाणे मलाही तो फारच नकारात्मक वाटला होता. त्यामानाने प्रलोभन बरा!
आज काल, 'अमक्या अमक्या ला पगार जास्त नाही पण इन्सेंटीव्ह भरपूर मिळतो' अशा प्रकारचे वाक्य सर्रास ऐकू येते. ह्यामध्ये इन्सेंटीव्ह ऐवजी चपखल बसू शकेल असा मराठी शब्द शोधत होतो. परंतू नंतर लक्षात आले की ह्यामध्ये 'फायनॅनशिअल इन्सेंटीव्ह' असे अभिप्रेत असून बोलताना त्यातला 'फायनॅनशिअल हा भाग वगळला जातो. त्यामुळे वरील वाक्य इंग्रजी शब्द न वापरता 'अमक्या अमक्या ला पगार जास्त नाही आहे पण आर्थिक प्रोत्साहन/उत्तेजन भरपुर मिळते' असे होऊ शकेल का?
ह्यातुनच मनात आलेली आणखी एक शंका - जर इकॉनॉमीकल म्हणजे आर्थिक तर फायनॅनशिअल म्हणजे काय? ह्या दोन्ही मध्ये नक्की काय फरक आहे?