संजोपराव,
स्पष्ट अभिप्रायाबद्दल धन्यवाद. काही जणांच्या तोंडून मीही असे काही अभिप्राय ऐकले आहेत. एका प्राध्यापकांनी त्यांचे भाषण ऐकताना खूप वेगळा अनुभव येतो; पण भाषण संपवून बाहेर पडलो की मग मात्र काहीच आठवत नाही असाही अभिप्राय दिला आहे. शेवटी आपण म्हणता त्याप्रमाणे हा श्रद्धेचा प्रश्न आहे. त्यांच्या लेखनाविषयी मात्र असे म्हणता येणार नाही. कारण त्यांच्या लेखनात (वक्तृत्वाप्रमाणे) भाषेचे सौंदर्य असतेच पण वैचारिक विवेचनही असते. फरक इतकाच की प्रत्यक्ष भाषण एकदाच ऐकता येते. लेखन परत परत वाचून समजावून घेता येते. कदाचित त्यामुळे असे वाटत असेल. पण ही व्यक्ती खरोखरच "वक्ता दशसहस्रेशु" म्हणावी अशी आहे.
अवधूत.