डिपेंडंट व्हिसावर अर्थार्जन करणे हे अवैध आहे;

आपण बहुधा एच ४ डिपेंडंट व्हिसाबद्दल बोलत आहात. जे२ या व्हिसावर अर्थार्जन करणे कायदेशीर आहे. रोहिणीने काही दिवस तसे केले आहे.

मान्य. जे२ डिपेंडंट व्हिसावर अर्थार्जन करणे वैध आहे या बाबीचे विस्मरण झाले होते हे कबूल करतो.

मात्र जे२ व्हिसा हा जे१ व्हिसाचा (एक्स्चेंज व्हिजिटर? एक्स्चेंज स्कॉलर?) डिपेंडंट व्हिसा आहे. भारतातून (किंवा कोठूनही) अमेरिकेत येणाऱ्यांमध्ये जे१ व्हिसावर येणाऱ्यांचे प्रमाण बहुधा खूपच कमी असावे, असे वाटते. भारतातून अमेरिकेत नोकरीनिमित्ताने येणाऱ्यांमध्ये एच१बी व्हिसावर (एम्प्लॉयमेंट व्हिसा) येणाऱ्यांचाच भरणा अधिक, तस्मात् अशांच्या जोडीदारांस एच४ व्हिसावाचून (एच कॅटेगरीतील डिपेंडंट व्हिसा) पर्याय नाही, आणि एच४ व्हिसावर अर्थार्जन करणे हे अवैध आहे.

त्यामुळे जे२ या डिपेंडंट व्हिसावर अर्थार्जन करणे तत्वतः शक्य असले, तरी बहुतांश भारतीय जोडीदारांस हा मुद्दा लागू होणार नाही, असे वाटते.

- टग्या.

अवांतर: (कायद्याचे तपशील नक्की माहीत नाहीत, परंतु) जे१ व्हिसा हा तत्त्वतः 'एक्स्चेंज प्रोग्राम'वर आधारित असल्याने, काही कालावधीनंतर मायदेशी परत जाऊन काही ठराविक वर्षे मायभूमीत व्यतित (व्यतीत? शुद्धलेखन?) करणे हे या व्हिसाच्या तरतुदीनुसार (दोन्ही सरकारांकडून) अपेक्षित असते, आणि त्यामुळे या ठराविक वर्षांच्या कालावधीत अमेरिकेत (कोणत्याही व्हिसावर) येता येणे तत्त्वतः अपेक्षित नसते, परंतु मायदेशीच्या सरकारची(प्रस्तुत संदर्भात भारत सरकारची) हरकत नसल्यास व मायदेशाच्या (प्रस्तुत संदर्भात भारताच्या) वकिलातीकडून अथवा कॉन्सुलेटकडून तसे ना-हरकत पत्र मिळवल्यास (आणि अर्थातच दुसऱ्या प्रकारचा अमेरिकन व्हिसा स्पॉन्सर करणारा कोणी असल्यास) अमेरिकन सरकारकडून तत्त्वतः कोणताही अडथळा येत नाही, असे काहीसे समजते.