एकतर मुंबईत ज्यांनी दंगल अनुभवली त्यांना नक्किच माहीती असेल शिवसेना कशी त्यांच्या मदतीला धाऊन आलेली.
नक्कीच आली, आणि त्याबद्दल शिवसेनेचे आभार.
आपल्या पैकी बरेच जण कुत्रा पाळतात, त्या कुत्र्याचा क्वचित त्रास आपल्यालाही होऊ शकतो पण वेळ पडल्यावर हाच कुत्रा चोरांवर चाल करुन आपल्या मदतीला येतो, शहाण्या माणसाने काय तो बोध घ्यावा.
कुत्रा आपल्याला क्वचित त्रास देतो तेव्हा त्यालाही आपण आपल्या परीने शिस्त लावतोच. शिवसेनेला अशी शिस्त लावण्याची तुमच्या आमच्यात ताकद नाही, आणि शिवसेनेच्या (तसेच इतर पक्षांच्याही) नेत्यांना तशी शिस्त पक्षात असावी असे मनापासून वाटतही नाही.
संकटकाळी मदतीस धावून येणाऱ्या, पण राष्ट्रीय मालमत्तेबद्दलही आदर असणाऱ्या - अशा एखाद्या राजकीय पक्षाची स्वप्नेही पाहू नयेत काय?
प्रथम साहेब, आज मांसाहेबांसाठी कुण्या एका नीता ट्रॅवल्स ची बस जाळली त्याला तुम्ही अपरिहार्य (किंवा असंच काहीसं) म्हणताहात. त्यामुळे उद्या थोरल्या किंवा धाकल्या वहिनीसाहेबांवरून परत "राडा" झाला, तर तुमच्या गाडीच्या आणि दुकानाच्या किल्ल्या तुम्ही स्वतःहून शिवसैनिकांच्या हवाली कराल अशी अपेक्षा आहे.
- कोंबडी