जुन्या गोष्टी उगाळून केवळ ब्राह्मणांना दोष देत बसण्यापेक्षा सामंजस्याने एकत्रितरीत्या काम करून सर्वांनी पुढे जावे हे महत्वाचे आहे. आज जे सतत ओरड करतात त्यांच्यापैकी कितीजण पूर्वी ब्राह्मणांनी केलेला (तथाकथित) छळ बघायला होते? आणि सर्वणांमध्ये फक्त ब्राह्मणच येत नाहीत. मग ब्राह्मणांनाच दोष का?
गेली ५०-६० वर्षे ब्राह्मणेतर (सवर्णेतर) आरक्षणाचा लाभ घेतायतत. सर्व सरकारी कार्यालयात आज त्यांचीच संख्या जास्त आहे. सवर्णेतर माणसेच त्यांचे नेते आहेत. मग अजूनही प्रगती होत नाही म्हणून का रडताय?
आता खासगी क्षेत्रामध्ये आरक्षण लागू करा म्हणतात. का तर म्हणे आमच्या गुणवत्तेला संधी मिळत नाही. खासगी क्षेत्राने कधीच आजपर्यंत जातीचे दाखले मागितले नाहीत. मग ह्यांच्या गुणवत्तेला संधी का मिळत नाही?
जर ब्राह्मण इतरांचा व्देष करत असतील तर आज कितीतरी ब्राह्मणांनी सुरू केलेल्या कंपन्यांमध्ये मागासवर्गीयांमधील तरुणांना नोकरी मिळाली नसती.
शिळ्या कढीला ऊत आणण्यापेक्षा भविष्याचा विचार करून त्याप्रमाणे पावले टाकणे जास्त गरजेचे आहे.
माझ्या वरील मताशी कोणी सहमत व्हावे अशी मी अपेक्षा धरत नाही. मी केवळ माझे वैयक्तिक मत मांडले आहे.