या महाजाळावर सुध्दा मराठी लिहले जावे, वाचले जावे याच मताचा मी आहे. जवळ-जवळ वर्षापासुन मनोगत सारख्या व्यासपीटाच्या शोधात होतो. ही परमेश्वराची कृपाच आहे कि, प्रशासकांना मनोगताची कल्पनाच त्याच काळी सुचली.
मनोगत म्हणजे एखादे लहानपणी पाहिलेल्या स्वप्नासारखे आहे. जेंव्हा मनोगत चाचणी स्वरुपात होते तेंव्हा मी कमीत कमी १० लोंकाना मनोगतला भेट द्यावी अशी विनन्ती करीत असे. नतंर मनोगतची अधिकृत घोषणा झाली, तेंव्हा मी आजुबाजुच्या इंटरनेट कॅफेला भेट देत असे व मनोगत मराठितील पहिले महाजाळातील व्यासपीठ कसे हे रंगुन सांगत असे. त्यानंतर नागपुरच्या मराठी दैनिकात(नवराष्ट्र, लोकमत, तरुण भारत)प्रसिध्दीपत्रक दिले कि, हा आमचा पहीलाच यशस्वी प्रकल्प कसा आहे. सर्वात मुख्य म्हणजे या सुविधा विनामुल्य देतो, आणि मराठी लोंकानी याचा वापर करायला पाहिजे. इत्यादी, इत्यादी.
हे इतके सांगन्याचे कारण म्हणजे असाच प्रचार आपण इतर शहरात केला पाहिजे. आपले व्यासपीठ हे लक्षावधी लोंकापर्यन्त पोहोचलेले पाहिजे, आणि ही आपलीच जबाबदारी आहे असे मी मानतो.
त्यामुळे पुढेमागे ही सेवा व्यावसायिक मुल्यावरच दिली गेली पाहिजे असेही मला वाटते.
मी जे काही स्वप्न पाहात आहे, ते जर यशस्वी झाले तर, आपण महाराष्ट्रातील लक्षावधी लोंकापर्यन्त, शेतमजुर, दलीत, अशिक्षित, विध्यार्थी या पर्यन्त पोहोचु हे निश्तितच.
हा विचार आपण सर्वानी केला पाहिजे असे मला वाटते.
द्वारकानाथ. नागपुर.
प्रशासक या विचाराला अनुमोदन देतिलच, त्यांना न सांगता काही उठाठेवी मी केल्या असतील तर क्षमाही करतील.
या सर्व प्रकारात कृष्ण-यशोदेचे संबध कसे असतील याची मला पुर्व कल्पना आली असे म्हणायला हरकत नाही.