गझल थोडी शब्दबंबाळ (रोमँटिक असल्यामुळे असावी :) ) असली तरी आवडली. काही शेर अजून स्पष्ट झाले तर बरे होईल.
मतला विशेष आहे.
जाईच्या देहावरती प्राजक्त बहरला होता
ती खरी पालवी होती, तो ऋतू आपला होता
वाव्वा.
तसेच काही मिसरे फार आवडले. विशेषतः सानी मिसरे.
ओठांच्या सभोवताली ओठांचे कुंपण होते
होकार तरी गात्रांतुन बेभान उधळला होता
वा. मी बेफाम उधळला असेही वाचले.
चित्तरंजन
जाता-जाता
देहमंडपी ऐवजी देहात चालेल. सोहळा पुढे असल्याने मंडप वाचक गृहीत धरेल. अंधाररात्र ऐवजी रात्रही चालेलसे वाटते. घालुन घालवण्यातही मदत होईल. चुभूद्याघ्या.