अनुताई, सगळे प्रकार मस्तच आहेत. एखादा आणखी घालता येईल.

वादातला अपवादः प्रत्येक वादात चार चौघांची डोकी भेटली एकमत झालं की एकाने उठून त्याला विरोध करायचा आणि वादातला अपवाद शोधायचा. उदा., "सूर्य रोज पूर्वेला उगवतो" (व्यासंगी गॅलिलिओ शिष्यांना बाजूला ठेवू) या विधानावर "आमच्या पहाण्यात सूर्य नेहमी पश्चिमेला उगवतो" असं विधान ठोकून द्यायचं आणि भरघोस प्रतिसाद मिळवायचे.

------
(विषयांतर)

आता "सूर्य पश्चिमेला उगवतो" यावर कुठले प्रतिसाद अपेक्षितः

प्र.१ असहमत
आपले म्हणणे पटले नाही.

(असहमत उपप्रतिसादांची तिरपी रांग)

प्र.२ सहमत
मीही सूर्याला कधीकधी पश्चिमेला उगवताना पाहिलय असं वाटत.

(सहमत उपप्रतिसादांची तिरपी रांग, आणि शेवटी)

      उपप्रतिसादः अवं भाऊ
       तुमा सर्वास्नी रातची जास्त व्हते बगा!

प्र.३ निषेध
सूर्याला देव मानणाऱ्या समस्त पृथ्वीवासियांच्या तर्फे मी आपला निषेध करतो.

      उपप्रतिसादः अंधश्रद्धा
      आपल्याला अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्य समजावून घेण्याची नितांत गरज आहे.

.
.
.

(सगळ्यात शेवटी वादी प्रतिवादीची मांडवली)

प्र.४ पुरे

सूर्य पूर्वेला कि पश्चिमेला उगवतो यावर आपले तात्विक मतभेद दिसतात. तसे आपण दोघेही आपापल्या जागी बरोबरच आहोत तेव्हा हा वाद इथेच संपवू.

     उपप्रतिसादः हो हो सहमत

प्रतिसादांच गणित सध्या शिकते आहे.

(शिकाऊ) प्रियाली