१. व्यासंगपूर्णः
या प्रकारात मोडण्यासाठी तुमचा दांडगा अभ्यास आणि स्मरणशक्ती असावी लागते.१८९८ साली दिल्लीत झालेल्या काँग्रेस अधिवेशनाचा अहवाल, वेदातील अमुक एक पानावरील तमुक एका ऋचेचा खालून दुसरा चरण, बोलिव्हियाचा इतिहास, रसायनशास्त्रातील जटील अभिक्रिया, अमक्या एका संगीताबद्दल सखोल माहिती, तमकी एखादी करायला भयंकर कठीण आणि आपण सामान्यतः विकत घेऊन खात असलेल्या पदार्थाची पाककृती, एकाच पदार्थाच्या अनेक प्रकारे पाककृत्या, अमक्या शब्दकोषाच्या तमक्या पानावरील दुसऱ्या स्तंभातील वरुन १८ वा शब्द, १९२४ ला झालेला भारत-युगोस्लाव्हिया हॉकी सामना व त्यातले खेळाडू,अमक्या वृत्तातील सातवी मात्रा, अशा काही बहुजनांना अवगत नसलेल्या माहित्या मुखोद्गत असाव्या लागतात आणि त्या योग्य वेळी अधून मधून टाकता याव्या लागतात.

छे हो! आजकाल विकिपीडियासारख्या स्थळांमुळे काम सोपे झालेय... अर्थात तिथे काय शोधायचे ते माहीत पाहिजे म्हणा!

बाकी आपला हा लेख व्यासंगपूर्ण म्हणता येईल... :-)

- टग्या.