अनु,
पुलांच्या लेखांना येणारी प्रतिसाद संख्या रोडावत चालली ते पाहून चिंताक्रांत आहे. आमच्या पुलावरून वाहने नेण्यास लोक का कचरत आहेत त्याची कारणे हा लेख वाचताच समजली. खरे साहित्याच्या प्रांतात आम्हाला काही समजत नाही पण लेखाच्या शीर्षकाने लेख उघडण्याचा मोह दूर सारता आला नाही. तुमचा लेख आमच्यासारख्या कित्येकांना मार्गदर्शक आहे. त्याबद्दल आभारी आहोत. आता क्रमांक ६ या गटात लवकरात लवकर आम्हाला प्रवेश मिळावा हीच प्रार्थना. ह्याच प्रतिसादाने त्याचा श्रीगणेशा करावा असे मनात आहे.
जीवन जिज्ञासा