गझल बरी आहे पण

जाईच्या देहावरती प्राजक्त बहरला होता
ती खरी पालवी होती, तो ऋतू आपला होता

जाई आणि प्राजक्ताऐवजी कुठलेही फूल चालेल. त्यांचे महत्त्व स्पष्ट होत नाही.

मोहाची सलज्जतेशी रुजवात जाहली तेव्हा
आकाशी चंद्र स्वतःचे अस्तित्व विसरला होता

वरच्या ओळीच्या खालच्या ओळीशी संबंध लागत नाही बुवा.

मौनाची दुलई घेउन अंधाररात्र निजलेली
कायांची सळसळ होती, कल्लोळ माजला होता

मौन असेल तर सळसळ कसली. कल्लोळ कसला. विरोधाभास म्हणजे गझल नव्हे.

ओठांच्या सभोवताली ओठांचे कुंपण होते
होकार तरी गात्रांतुन बेभान उधळला होता

ओठांच्या सभोवताली ओठांचे कुंपण? काहीही. गात्रांतुन चूक.

ग्रीष्माच्या तलखीवरती झरलेल्या श्रावणधारा
प्रणयाचे चंदन लेउन मृद्गंध पसरला होता

तलख कसली? प्रणयाचे चंदन वगैरे भरीचे वाटते. लेउन चूक.

रात्रीचा झळाळ पाहुन आरक्त जाहली प्राची
अन देहमंडपी रक्तिम सोहळा रंगला होता

ठीक.