चिकनगुन्या हा डासांसारख्या कीटकांनी (arthropod )पसरणारा आणि विषाणूंमुळे (viruses)होणारा आजार आहे.एडिस प्रकारच्या डासांमुळे हा पसरतो. चिकनगुन्या या शब्दाचा आफ़्रिकन भाषेंतला अर्थ that which bends up अस होतो. बाधित डास चावल्यानंतर साधारण दोन ते तीन दिवसांनी थंडीभरून ताप येऊन अंगं अगदी मोडल्याप्रमाणे दुखून येतं. या बरोबरच भूक मंदावणे, डोळे लाल होणे, डोकेदुखी, पोटात दुखणे या गोष्टी चालू होतात.( कीटकांमुळे पसरणाऱ्या खूपशा तापात ही लक्षणे दिसतात आणि त्यांना constitutional symptoms म्हणतात. )सांधेदुखी एकानंतर एक अशा प्रकारे साऱ्या लहान आणि क्वचित मोठ्या सांध्यांना सुरू होते.२-३ दिवसांनी अंगावर बारिक पुरळ येऊन नंतर खपल्या धरतात. शक्यतो हा आजार स्वतःच बरा होतो, विशिष्ट औषध नाही ,. काही म्हाताऱ्या रुग्णांमध्ये मात्र सांधे आखडणे पाय सुजून येणे, सांध्यांत पाणी साठणे या गोष्टी बऱ्यांच महिन्यांपर्यंत दिसून येतात. जे रुग्ण HLA B 27 प्रकारच्या गुणसूत्रांच्या दोषाने अगोदरच बाधित आहेत त्यांना मात्र तरूणपणातच हा त्रास होऊ शकतो.
जीवंत विषाणू वापरून यावर एक लस (प्रतिबंधात्मक) तयार करण्यात आलीय पण बाजारात अजून मिळत नाही.