हा विषाणूमुळे होणारा आजार आहे. हा विषाणू डेंग्यू विषाणू ज्या गटात मोडतो त्याच गटातला आहे. डेंग्यूप्रमाणेच डासांच्या चावण्यातून पसरतो.याची लक्षणेही डेंग्यूसारखीच म्हणजेच ताप आणि अंग दुखणे.त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून मराठवाड्यात साथ आल्यापासून डेंग्यूसारखी भयानक साथ असल्याचं थोडं पॅनिक होतं.पण हा आजार डेंग्यूइतका गंभीर नाही.

डेंग्यूची गंभीर अवस्था म्हणाजे haemorragic fever म्हणजे रक्तातल्या प्लेट्लेट्स कमी झाल्यामुळे शरिरातून जागामिळेल तिथून रक्तस्त्राव सुरू होतो आणि लगेच प्लेटलेटस दिल्या न गेल्यास अर्थातच मृत्यू.

पण चिकनगुनियाची लक्षणे जरि डेंग्यूसारखी असली तरी हि haemorragic fever ची अवस्था मात्र त्यात जवळ्जवळ कधीच दिसत नाही.त्यामुळे चिकन्गुन्यामुळे मृत्यू सहसा होत नाही.

म्हणूनच फ़ार उपचारांची गरज नसते.फ़क्त लक्षणांसाठी औषधोपचार (symptomatic  management) आणि ठिक होईपर्यंत वैद्यकीय देखरेखीखाली ठेवणे‌. सगळ्यात महत्वाचं म्हणजे अर्थातच डासांचं नियंत्रण.