माहितीबद्दल आभार. मला एक प्रश्न पडला आहे. थोडा वादग्रस्त वाटेल. पण तरी विचारतो.
नवराबायकोने २०-३० वर्षे वेगळे रहाणे विचित्र नाही का वाटत? पुण्याच्या जहागिरीची व्यवस्था पहाण्याकरिता जिजाबाई व शिवाजी पुण्यात व शहाजी बंगळूरात राहिले असे सांगतात. पण एका जहागिरीसाठी वेगळा संसार मांडण्याइतकी जहागिर महत्त्वाची आहे का? नवराबायकोचे एकत्र रहाणे त्यापेक्षा महत्त्वाचे का नाही?
शहाजी महाराजांचे जाधव कुटुंबियांशी असलेले वितुष्ट हे ह्या वेगळे रहाण्यामागे कारण तर नसेल? कदाचित एक राजकीय तडजोड म्हणून शहाजी जिजाबाई विवाह तर घडला नसेल? शिवाजीसारखा पुरुषोत्तम जिने घडवला त्या जिजाबाईने पालनपोषणात व संस्कारात काही उणीव जाणवू दिली नसणार. पण तरी मला हे खटकते.