एकलव्य, प्रत्यक्ष माहितीबद्दल मनापासून आभार. एकूणातच हे प्रकरण आईबाबांना चांगलंच जड जाणार असं दिसतं आहे. स्वातंत्र्यदिन कधी उजाडतो आणि कधी मी घरी जातेय असं झालं आहे.
आमच्या ओळखीच्यांमध्ये आत्तापर्यंत वीसेक जणांना चिकुनगुन्या होऊन गेला आहे. वहिनीचा चिकुनगुन्या मागच्या आठवड्यात बरा होत नाही तर ३-४ दिवसांपुर्वी दादाला आणि काल आईबाबांना झाला आहे. ( ही सगळी बातमी मला आज मिळते आहे !!! ) आता तर श्रीचीही काळजी वाटते आहे.
ऐकीव माहितीनुसार : या रोगाला कारणीभूत ठरणारा डास हा दिवसा चावतो. हा डास स्वच्छ पाण्यात अंडी घालतो त्यामुळे घाण पाणी वगैरेशी याचा संबंध नाही आहे.
या डासाच्या उपद्रवापासून वाचण्यासाठी प्रतिबंधात्मक अशी काय उपाययोजना करता येईल?