मिलिन्द भांडारकरपंत,
(कुमारकाका,
"अता राहिलो मी जरासा जरासा" ही सुरेश भटांची कविता सुरेश वाडकरांनी ज्या चालीत म्हटली आहे, तीच चाल तुमच्याही नितांत सुंदर कवितेला बसते. तसे केले तर चालेल ना चित्तोपंत ? का रीमिक्स म्हणाल ?)
चित्तोपंतांचं उत्तर माहिती नाही.
मला असं वाटतं दोन्ही गझलांचं भुजंगप्रयात वृत्त असल्यामुळे एक चाल दुसऱ्या गझलेला बसू शकते. अर्थात बसू शकते याचा अर्थ शब्दार्थ / भावनेच्या दृष्टीनंही बसेल असं नाही. उदा. 'पहाटे पहाटे मला जाग आली' (कै. सुरेश भट) किंवा 'प्रिया आज माझी' (यशवंत देव) चंही वृत्त हेच आहे. पण त्या चाली या गझलेला मला तरी चांगल्या वाटल्या नाहीत.
'अता राहिलो मी'ची चाल मला माहिती नाहीये, त्यामुळे त्याबद्दल मी काहीच बोलू शकत नाही; पण शक्य आहे चांगली वाटणंही!
मी स्वतः 'चारुकेशी' रागात चाल लावायचा प्रयत्न केला.. 'मतला' तयार आहे; पण पुढचे शेर फार एकसुरी व्हायला लागले.. अजून प्रयत्न चालू आहे.
----
चोखंदळबुवा,
आपली प्रतिक्रिया वाचून मनमोकळं हसलो... ते हसू तुमच्यापर्यंत पोहोचावं म्हणून ही (शब्दवेल्हाळ नसलेली) प्रतिक्रिया.
- कुमार