विनायकराव, वृकोदर महाशय आणि इतर मनोगतींनो

नकारात्मक टीकेचं प्रमाण वाढल्याच्या चर्चेपासून सगळेच मनोगती आता ताक पण फुंकून प्यायला लागलेले दिसतात. प्रत्येक प्रतिसादाच्या शेवटी "डिस्क्लेमर" लिहीणं आता आवश्यक झालं आहे का? मला तरी वाटतंय कि ह्या सगळ्यामुळे आपलंच, पर्यायाने मनोगताचं नुकसान तर होणार नाही ना? जर प्रत्येकानेच असं तोलून मापून बोलायचं ठरवलं तर मनोगताचं नावच बदलावं लागेल.

तेव्हा हा सगळा विषयच (नकारात्मक टीकेचा - आणि त्याच्या परिणामांचा) आपण एखाद्या जीर्ण बासनात गुंडाळून टाकायला हवा. नाहीतर माझ्यासारखे नवशिके, अज्ञानी मनोगती मनोगतावर येणंच भीतीने बंद करतील.

आपली मर्जी!!