गंभीर कथाविषय. सुंदर हाताळणी.

मी तर म्हणेन की सुटला बिचारा प्रशांत. इतकी फाजील बायको असण्यापेक्षा नसलेलीच बरी. :)

लोकांचं काय हो, लोक बोलतील बोलतील आणि गप्प बसतील. त्याचा विचार प्रशांतने आणि त्याच्या आईबाबांनी करू नये.

प्रशांतने आनंद साजरा करण्याऐवजी हमसाहमशी रडावं असं मला तरी वाटत नाही. पण ते ठीक आहे, असतो एकेकाचा स्वभाव...

रसभंग करणारी प्रतिक्रिया. सतत सर्व गोष्टींकडे हल्लक्याफुल्लक्या नजरेने बघणे हे मूळ विचारांना बाधक ठरू शकते ते असे. एरवी संवेदनशील (म्हणवणाऱ्या?) व्यक्तींकडून हे अपेक्षित नाही. असो. प्रतिक्रियेची जागा चुकली की तिचे महत्त्व संपते (उदा. मुंबई स्फोट चर्चेतील नाम्याचा प्रतिसाद). पण असोच.
भावनावेगाने रडणाऱ्या पुरुषाला कसं सावरायचं ते अजूनही मला शिकायचं आहे.

तूर्त अशीही काही पुरुषाची गरज असू शकते इतके समस्त स्त्रीजातीने समजून घेतले तरी पुरे.

आभार, प्रियाली.