हमसाहमशी रडणं ही उत्स्फुर्त आणि नैसर्गिक प्रतिक्रिया (स्त्री आणि पुरुष दोघांचीही) आहे. जखम ताजी असतानाची. भविष्यात, जन्मभर अस सहन करण्या पेक्षा घटस्फोटातच आनंद आहे अस प्रशांतच मत बनू शकेल. पण त्यासाठी थोडा वेळ जाण आवश्यक आहे.
माणूस आपल्याबरोबर आजू बाजूच्या समाजाचा विचार करतो हे टाळता येत नाही.
भावनावेगाने रडणारे पुरुष नेभळट नसतात. रडणं हे त्याच्या मनुष्य असण्याचं एक लक्षण आहे.
बाकी, सतत रडगाणं गाणारे पुरुष आणि स्त्री दोघांनाही नेभळटच म्हणावं पण ते वरील कथेला लागू होत नाही.