गोळेकाका,

काही ओळी गाताना अडचण येते आहे; प्रसंगी अनुवाद बराचसा शब्दशः झाल्याचेही दिसते आहे. त्या अनुषंगाने काही सुचवण्या कराव्याशा वाटत आहेत.

सोबत मी जीवनाची, पुढे करीत चाललो ।
---
'ही साथ जीवनाची मी करीत चाललो' असे केल्यास अधिक गेय होईलसे वाटते.

जे लाभले हातात, त्यास नशीब मानले ।
या ओळीत नशीब च्या ऐवजी दैव हा शब्द योजल्यास ओळ अधिक गेय होते आहे, असे मला वाटते. जे लाभले हातात, त्यास दैव मानले ।

बरबादियों का जश्न मनाता चला गया मध्ये जश्न साठी मोद ऐवजी जल्लोष शब्द मला अधिक योग्य वाटतो. मोद = आनंद तर जल्लोष = जश्न. तुम्हाला काय वाटते? या कडव्यातही 'मी' आलाय ज़ो मूळ रचनेत नाही. इकडे जल्लोष योजल्यास बाकीची ओळ कशी अनुवादित करावी, हे मला या क्षणीच सांगता येत नाहीये ः(

त्याच धर्तीवर सुखदुःखभेद मुळी न, मला जाणवे जिथे । या ऐवजी सुखदुःखभेद ना मुळीच जाणवे जिथे । मूळ गाण्यातही या ओळीत मै नाही त्यामुळे इकडे मी नसण्यास हरकत नसावी.

मूळ गाण्याच्या चालीतच अनुवाद गाता आळ्यास लज़्ज़त वाढेल, म्हणून या सुचवण्या केल्या आहेत. कृपया गैरसमज़ नसावा. आपल्याला इतरत्रही काही सुचवण्या मिळाल्या असतील. त्यानुसार सुधारीत आवृत्ती वाचायला नक्कीच आवडेल.

शुभेच्छा.