चर्चेत भाग घेऊन मार्गदर्शन/सदिच्छा दिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार.

काल रात्री श्रीलाही ताप येऊन तिचे अंग अवठरले आहे. तिचाही ताप चिकुनगुन्याचीच लक्षणे दाखवणारा ठरतो आहे. आज दुपारपर्यंत माझ्या रजेची तजवीज होईल ( असे वाटते ) अथवा न होईल आणि  मी घराकडे रवाना होणार आहे. अशा एकूण परिस्थितीमुळे जर संबंधित रोगाच्या उपचारास्तव, प्रसारप्रतिबंधात्मक असे काही माझ्या पातळीवर करता येण्याजोगे असेल तर सांगावे, ही कळकळीची विनंती.