कोरडा मधुचंद्र गेला, दोस्तहो
मम प्रियेची गाईगाई चालली

वाढली संख्या सख्यांची एव्हढी
प्रेमपत्रांची छपाई चालली

मांडवाखालून गेल्या मैत्रिणी
सोबतीने फक्त ताई चालली

साथ आली मान दुखण्याची कशी
ती पहा एक टंच बाई चालली

आपल्या प्रतिभेला साष्टांग दंडवत!

जयन्ता५२